ग्रामस्तरावरील उद्योजक म्हणजे काय?

VLE म्हणजे काय?

ग्रामीण भागात केंद्र व राज्यशासनाच्या विविध कल्याणकारी योजना ह्या स्थानिक उद्योजाकामार्फत राबविण्यात याव्या अशाप्रकारचे दिशानिर्देश देण्यात आलेले आहे. ग्रामस्तरावरील सुशिक्षित युवावर्गाच्या कौशल्याचा वापर स्थानिक पातळीवरील प्रशासकीय व विविध जनकल्याणकारी योजना करता होणे महत्वाचे आहे.

ग्रामीण भागातील तरुण वर्गात व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण होण्याकरिता तसेच त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता VLE ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे.

ग्रामस्तरावरील उद्योजकाची वित्तीय समावेशन मार्फत उद्योजकतेकडून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल :

VLE ची Financial Inclusion मार्फत उद्योजकतेकडून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल

CSC (Common Service Center), CSC (E-Governance Service India Limited) व Mahaonline यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने VLE ची बॅंक प्रतिनिधी (Bank Representative) म्‍हणुन निवड करण्‍यात आलेली आहे.

1.   गावातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे वैयक्तिक बचत खाते काढुन देणे, खात्‍यातुन रक्‍कमेची देवाणघेवाण करणे, आवर्ती जमा खाते उघडणे ईत्यादी कामासाठी प्रत्‍येक व्यवहाराकरीता VLE यांना मोबदला दिला जाणार आहे.

2.   Third Party Financial Products म्‍हणजेच विमा व क्रूषीसंबंधित विविध ग्राहक सुविधा इत्यादी माध्‍यमातुन VLE यांना मोबदला दिला जाणार आहे.

3.   भविष्‍यात येणा-या विवीध शासकीय, आर्थिक योजनांचा तसेच बॅंकेच्‍या सेवांचा मोबदला VLE यांना प्राप्त होणार आहे.

4.   VLE (ग्रामस्‍तरावरील उद्योजकांना) वित्तीय समावेशनात (FI) सहभाग मिळुन देण्‍याचा व उदयोजगतेकडून आर्थिक सक्षमतेकडे नेण्‍याचा संग्रामचा हा महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.

संग्राम केंन्द्राच्या ग्रामस्तरावरील उद्योजका करिता दस्तऐवजीकरण चे महत्व :

संग्राम केंन्द्राच्या VLE करिता दस्तऐवजीकरण (Documentation) चे महत्व:-

VLE (ग्रामस्त रावरील उद्योजकांना) वित्तीय समावेशन (Financial Inclusion) तसेच भविष्यात संग्राम प्रकल्पाच्या माध्यमातुन आलेल्या योजनांमध्ये सहभागी होण्या साठी विविध नियम व अटी कागदोपत्री मान्य) करणे अनिवार्य आहे. सदर उद्देश साध्य करण्याकरीता (ग्रामस्तेरावरील उद्योजकांना) VLE Documentation महत्वाचे आहे.

ग्राममार्ट :

ग्राममार्ट ( http://grammart.in/ )

Grammart: ग्रामीण भागातील बचत गटांची विविध उत्पादने तसेच शेती किवा शेतीविषयक असलेल्या सर्व उत्पादनाच्या विपणन तसेच विक्रीकरिता ग्राममार्ट वेबसाईट च्या माधमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आलेले आहे.

बचत गटामार्फत उत्पादित करण्यात आलेल्या वस्तूंना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ग्राममार्ट च्या माध्यमातून करण्यात येत आहे. उत्पादक ते ग्राहक यांचा थेट समन्वक करण्याकरिता ग्राममार्ट प्रयत्नशील आहे. बचत गटांना ग्राममार्ट संघा मध्ये सामील होण्याचे निकष म्हणजेच बचत गटांना shgonline.in मध्ये नोंदणी करून ग्राममार्ट च्या व्यासपीठाचा उपयोग होण्यास मदत होईल, सदरील नोंदणी हि निशुल्क आहे. ग्राममार्ट चे प्रतिनिधी हे जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर स्थायिक आहेत व माहिती देण्यास उपलब्ध आहेत.

बचत गट संगणक प्रणाली विषयी :

बचत गट संगणक प्रणाली (http://shgonline.in) विषयी

आपल्या देशात ४० लाखाहून हि अधिक महिला बचत गट आहेत. बचत गटा मुळे ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होते त्यामुळे बचत गटाचे महत्व हळूहळू वाढत आहे. स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून महिला उद्योग-व्यवसायाकडे वळत आहेत. त्यातून रोजगारनिर्मिती होण्यास मदत होत आहे. महिला स्वयंसहाय्यता गट सुरू करतात. पैशाची बचतही करतात.त्यामूळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व स्वाभिमानाने जगण्यास मदत होते.

SHG (http://shgonline.in/ ) ह्या संगणक प्रणालीमुळे बचत गटाचे रोजचे व्यवहार संगणकावर नोंदवले जातात. बचत गटाचे संपुर्ण व्यवस्थापन संगणक प्रणालीमुळे होऊ शकणार आहे. ही संगणक प्रणाली बचत गटासाठी निशुल्क उपलब्ध आहे.

स्थानिक कंपनी विषयक :

Online Company (स्थानिक कंपनी) विषयक:

संग्राम प्रकल्पांतर्गत स्थनिक स्तरावरील व्यवस्थापन करण्याकरिता व कामात सुसूत्रता आणण्याकरिता, ग्रामस्तरावरील उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना सहभागी करण्यात आलेले आहे.

संग्राम प्रकल्पांतर्गत ग्रामस्तरावरील उद्योजकांकारिता खालील नमूद केल्याप्रमाणे कामाचे निकष व संबधित मोबदला ठरविण्यात आलेला आहेत.

  1. Annexure A

ग्रामस्तरावरील उद्योजक दस्तऐवजीकरण प्रकियेविषयक व इतर माहिती संपर्क सूची :

VLE दस्तऐवजीकरण (VLE Documentation) प्रकियेविषयक आधिक माहीतीसाठी खालील विभागीय समन्वयकांशी संपर्क करावा...

Name

Contact No.

District

Name

Contact No.

District

Anand Kulkarni

9225662011

BHANDARA / NAGPUR / WARDHA

Anil Ingulkar

9225661951

CHANDRAPUR / GADCHIROLI / GONDIYA

Vishwas Ashturkar

9225067489

LATUR / NANDED / HINGOLI /
PARBHANI

Gajanan Wani

9225664949

RAIGAD / THANE

Nitin Mhetre

9225067410

BEED / BULDHANA /AURANGABAD / JALANA /
JALGAON

Prashant Kadam

9225660022

DHULE / NANDURBAR / NASHIK

Rahul D

9225660011

020- 67000077

AHAMADNAGAR / PUNE / OSMNABAD
SOLAPUR

Rajesh Lokhande

9225337949

AKOLA / AMRAVATI / WASHIM / YEOTMAL

Suhas Potnis

9225067300

KOLHAPUR / RATNAGIRI /
SANGALI / SATARA / SINDHDURG

 

 

 

 

Name

Contact No.

Area

Name

Contact No.

Area

Anant Raghute

020- 67000000

For All

Nitin Muley

020- 67000069

For All